उद्या वडवणी, धारूर, माजलगांव, गेवराईत पाहणी...

 ना.पंकजा मुंडे यांनी दुष्काळ पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांना दिला धीर


राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा
 

 उद्या वडवणी, धारूर, माजलगांव, गेवराईत पाहणी करणार

बीड दि. ०४ ---

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज बीड व पाटोदा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतातील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. खचून जाऊ नका, सरकार खंबीरपणे आपल्या पाठिशी उभा आहे अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

     बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. मागील आठवड्यात परळी, अंबाजोगाई, केज तालुक्याचा दौरा केल्यानंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी आज बीड तालुक्यातील काकडहिरा, मूर्शदपूर, वंजारवाडी व पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी, रोहतवाडी, थेरला, जवळाला, तांबा राजूरी आदी ठिकाणी  शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.  भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, विजय गोल्हार, योगेश क्षीरसागर, सर्जेराव तांदळे, सलीम जहांगीर, अशोक लोढा, अनुरथ सानप, मधुकर गर्जे, सुधीर घुमरे, सुवर्णा लांबरूड आदी यावेळी उपस्थित होते.


  सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी यात झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. यासाठी मी प्रत्यक्ष बांधावर जाऊन  पाहणी करत आहे, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे त्या म्हणाल्या.आम्ही दर मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळाचा आढावा घेत असतो, काय उपाययोजना करता येतील याची चर्चा करत असतो. परवाच्या बैठकीतही यावर चर्चा होणार आहे असे त्या म्हणाल्या.

सरकार संवदेनशीलपणे काम करत आहे

-------

दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे, याची सरकारला जाणीव आहे. सरकार यात संवेदनशील काम करत असल्यामुळेच एवढ्या लवकर दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळातील प्रत्येक गोष्ट सरकार गंभीरपणे घेत आहे. सध्या तरी पशुधनाला पुरेल इतका चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे, तथापि, कमी पडल्यास जिथे दुष्काळ नाही तेथून चारा उपलब्ध  करून देऊ असं सांगत बळीराजाने खचून जाऊ नये, सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे असं ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

उद्या वडवणी, धारूर, माजलगांव, गेवराईत पाहणी

--------

ना. पंकजा मुंडे उद्या सोमवारी (ता.०५)  दुपारी २ ते ६ वा. दरम्यान मोरवड, पुसरा (वडवणी), तेलगाव (धारूर), नित्रुड, पात्रुड, हरकी लिमगाव (माजलगांव), मारफळा तांडा, अर्धमसला (गेवराई) आदी ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार असल्याचे त्यांच्या संपर्क कार्यालयातून सांगण्यात आले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!