अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार — तहसीलदार

बोरना प्रकल्पातील अनधिकृत पाणी उपशावर कारवाई


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

          परळी तालुक्यातील नंदनज, कासारवाडी, मिरवट, सारडगाव, मांडवा आणि मरळवाडी परिसरासाठी महत्त्वाच्या असलेल्या बोरना मध्यम प्रकल्पात सध्या १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. या प्रकल्पातूनही अनधिकृतपणे पाणी उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत पाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारी व पंपांवर कारवाई करून पाणीसाठ्याचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.

     बोरणा प्रकल्पातून सुरू असलेल्या अनधिकृत पाणी उपशावर अखेर तहसील प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकाने प्रकल्प परिसरात कारवाई करत अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या मोटारी बंद केल्या. संबंधित डीपी बंद करून खाली काढण्यात आल्याने अनधिकृत पाणी उपशाला आळा बसला आहे. बोरना हे प्रकल्प तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे जलस्रोत असल्याने उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे वाणप्रमाणेच बोरना प्रकल्प परिसरातही अनधिकृत पाणी उपशावर सातत्याने लक्ष ठेवून कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.


*अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार — तहसीलदार*

“बोरना प्रकल्पासह परळी तालुक्यातील कोणत्याही जलस्रोतामधून अनधिकृत पाणी उपसा होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित मोटारी, पंप व वीज जोडण्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. पिण्याच्या पाण्याचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाहणी करून कठोर कारवाई केली जाईल.”

— विनोद रनवरे, तहसीलदार, परळी वैजनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!