परळीकरांच्या तोंडाला पाने पुसली!
रेल्वेची आश्वासने फोल; संतापाचा उद्रेक होण्याची चिन्हे
मुंबईची थेट रेल्वे नाहीच; मछलीपट्टणम–बिदर एक्स्प्रेसचा विस्तारही हवेत!
परळी रेल्वे विकास समिती आक्रमक, शहर बंदसह महामोर्चाची तयारी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी : उपोषण सोडविताना आश्वासनांची खैरात, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी हात वर! दक्षिण मध्य रेल्वेच्या या भूमिकेमुळे परळीकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. परळीमार्गे मुंबईला थेट रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन अद्याप कागदावरच असून, नवरात्रोत्सवाच्या काळात मछलीपट्टणम–बिदर सुपरफास्ट एक्स्प्रेस परळीपर्यंत विस्तारित करण्याबाबत दिलेले आश्वासनही प्रत्यक्षात उतरलेले नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या आश्वासनांवर विश्वास तरी किती ठेवायचा? असा संतप्त सवाल परळीकर उपस्थित करीत आहेत.
दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी जी. एस. सौंदळे गुरुजी यांनी परळी रेल्वेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण केले होते. हे उपोषण सोडविताना दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाचे विभागीय व्यवस्थापक आर. गोपाल कृष्णन यांनी परळीच्या रेल्वे प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. दि. ९ ते २५ ऑक्टोबर २०२६ या नवरात्रोत्सवाच्या कालावधीत मछलीपट्टणम–बिदर (१२७४९/१२७५०) एक्स्प्रेस परळी वैजनाथपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर विस्तारित करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचबरोबर परळीमार्गे मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी सकारात्मक शिफारस करण्याचेही सांगण्यात आले होते.
मात्र, ९ ऑक्टोबर उजाडला तरी परळीकरांच्या पदरी निराशाच पडली आहे. ना मुंबईची थेट रेल्वे, ना मछलीपट्टणम–बिदर एक्स्प्रेसचा परळीपर्यंत विस्तार! उपोषण सोडविताना दिलेल्या आश्वासनांचे पुढे काय झाले, याबाबत प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. आश्वासन देताना तत्परता आणि अंमलबजावणीच्या वेळी उदासीनता, हा रेल्वे प्रशासनाचा नेमका कोणता कारभार? असा सवाल उपस्थित होत आहे.
परळीला सापत्न वागणूक; रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
परळी वैजनाथ हे धार्मिक, व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. देशभरातून भाविक परळीत येतात; तर मुंबईसह प्रमुख शहरांशी थेट रेल्वे संपर्काची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. असे असतानाही परळीच्या रेल्वे सुविधांचा प्रश्न वारंवार प्रलंबित राहणे, ही नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाला महत्त्व असूनही येथील मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप परळी रेल्वे विकास समितीचे मुख्य समन्वयक कैलास तांदळे यांनी केला आहे.

आता निर्णायक लढ्याची तयारी; शहर बंद आणि महामोर्चाचा इशारा!
रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी परळी रेल्वे विकास समितीने आंदोलन अधिक व्यापक करण्याची भूमिका घेतली आहे. परळी शहर बंद ठेवणे आणि परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर महामोर्चा काढणे, यासह पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. यासाठी समिती लवकरच बैठक घेऊन आंदोलनाची रूपरेषा निश्चित करणार असल्याचे कैलास तांदळे यांनी सांगितले.
या आंदोलनात प्रमुख मागण्या अशा असतील :
• परळीमार्गे मुंबईला थेट रेल्वे सुरू करा!
• मछलीपट्टणम–बिदर सुपरफास्ट एक्स्प्रेस परळीपर्यंत विस्तारित करा!
• परळी वैजनाथ रेल्वे स्थानक मध्य रेल्वेला जोडण्याबाबत ठोस निर्णय घ्या.
• परळी रेल्वे स्थानकात पीट लाइन उभारण्याची मागणी मार्गी लावा.
• परळीच्या रेल्वे विकासाशी संबंधित प्रलंबित मागण्यांवर कालमर्यादेत कार्यवाही करा.
कागदी आश्वासने नकोत; परळीकरांना हक्काच्या रेल्वे सुविधा हव्यात!
परळीकरांनी उपोषण, निवेदने आणि पाठपुराव्याचा मार्ग स्वीकारूनही महत्त्वाच्या मागण्यांवर ठोस प्रगती दिसत नसल्याने असंतोष वाढत आहे. आता केवळ सकारात्मक शिफारशींचा उल्लेख करून प्रश्न सुटणार नाही; रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी अधिकृत निर्णय, निश्चित कालमर्यादा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी आवश्यक आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा