जमिनीच्या फेरफारसाठी मागितले पैसे...

केज तहसीलच्या आवारात लाचखोर ग्राम महसूल अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात 

 केज :- केज तहसीलच्या आवारात एका शेतकऱ्याकडून आठ हजार रु. ची लाच स्वीकारताना उमरी सज्जाचे ग्राममहसूल अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात सापडला आहे.

केज तालुक्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या जमिनीचा फेरफार नोंद घेण्यासाठी उमरी सज्जाचे ग्राममहसूल अधिकारी परमेश्वर फलके यांनी शेतकऱ्याकडे लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार शेतकरी यांना लाच देण्याची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी बीड येथील लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. 

लाचलुचपत पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्या तक्रारी संदर्भात प्राथमिक चौकशी करून त्याची पडताळणी केल्या नंतर या प्रकरणी कारवाई करण्याचे निश्चित केले. 

दि. ८ ऑक्टोबर रोजी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुपारी केज तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. तक्रारदार शेतकरी यांच्या कडून तहसील कार्यालयाच्या आवारात ग्राममहसूल अधिकारी परमेश्वर फलके हे लाच स्वीकारीत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ  ताब्यात घेतले. 

या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान कवडे, अनिल शेळके, अविनाश गवळी, पांडुरंग काचंगुंडे तसेच चालक गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!