लाचखोरी :जिल्ह्यात दिवसात दुसरी घटना; सेवानिवृत्त तालुका पशुधन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

बीड:प्रतिनिधी...

     लाचखोरीची बीड जिल्ह्यात दिवसात दुसरी घटना घडली असून सेवानिवृत्त तालुका पशुधन अधिकार्‍यासह तिघाजनांना लाच रुजवत प्रतिबंधक विभागांनी जाळ्यात पकडले आहे नोकरीत असताना चा कार्यकाळातील फाईलवर सह्या करण्यासाठी लाचेची रक्कम घेताना सेवानिवृत्त तालुका पशुधन अधिकारी पकडण्यात आले आहे.

        डॉ. धर्मराज बयाजी कदम हे पाटोदा पंचायत समिती अंतर्गत तालुका पशुधन अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळातील गायींच्या फाईलवर स्वाक्षरी करून मंजुरी देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार तालुका पशुधन पर्यवेक्षक शांतीलाल बाबुराव धुदावडे यांनी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे समोर आले. तर खासगी व्यक्ती दत्ताराम तुकाराम साठे याने लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. या प्रकरणात डॉ. धर्मराज कदम, शांतीलाल धुदावडे आणि दत्ताराम साठे यांच्याविरुद्ध पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकाच दिवशी एसीबीच्या दोन कारवायांमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    दरम्यान सकाळच्या सत्रात केज तालुक्यात एका तलाठ्याला फेरफार साठी पैशाची मागणी केली म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाळ्यात घेतले आहे.  त्यानंतर पाटोद्याची ही दुसरी घटना घडली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!