पदवीधरांच्या प्रश्नांसाठी नवी दिशा; अंकुश रामराव शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
छत्रपती संभाजीनगर, दि. ५ ऑक्टोबर २०२६ (:प्रतिनिधी ). मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी पोलीस आयुक्त अंकुश रामराव शिंदे यांनी आज, सोमवार दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
छत्रपती संभाजीनगर येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी आपला नामनिर्देशन अर्ज सादर केला. यावेळी त्यांच्या समर्थकांसह पदवीधर, सामाजिक कार्यकर्ते आणि सहकारी उपस्थित होते.पदवीधर युवकांचे प्रश्न, रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षार्थींच्या अडचणी, शैक्षणिक सुविधा तसेच प्रशासनाशी संबंधित प्रश्न यावर काम करण्याचा मुद्दा त्यांच्या उमेदवारीच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगण्यात आले.
मा. अंकुश रामराव शिंदे यांनी पोलीस प्रशासनातील प्रदीर्घ अनुभवाच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील राजकीय चित्र अधिक चर्चेत आले आहे.आज अर्ज दाखल करताना उपस्थितांनी शुभेच्छा देत पदवीधरांच्या प्रश्नांसाठी सक्रिय राहावे ही अपेक्षा व्यक्त केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा