ना. पंकजा मुंडे यांची ऊसतोड मजूर व मुकादम संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट ; गोरक्ष रसाळ यांचा पुढाकार

ताईसाहेब, ऊसतोड मजूरांना आतापर्यंत तुम्हीच दरवाढ दिली, भविष्यात देखील तुम्हीच न्याय देऊ शकता' - संघटनेने व्यक्त केल्या भावना

बीड दि. ०५ --- 

गोपीनाथराव मुंडे साहेब ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटनेच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन दरवाढ व इतर मागण्यांचे निवेदन सादर केले. 'ताईसाहेब.. ऊसतोड मजूरांना आतापर्यंत तुम्हीच दरवाढ दिली, भविष्यात देखील आम्हाला तुम्हीच न्याय देऊ शकता' अशा भावना यावेळी शिष्टमंडळाने त्यांच्यासमोर व्यक्त केल्या.

     साखर कारखानदार आणि ऊसतोड मजूरांचा जो लवाद आहे, त्या लवादाच्या प्रमुख ना. पंकजाताई मुंडे आहेत. ऊसतोड मजूरांचा सध्याचा दरवाढीचा करार संपल्यामुळे पुढील दरवाढ ठरविण्यासाठी गोपीनाथराव मुंडे साहेब ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदार संघटनेच्या शिष्टमंडळाने ना.पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन  विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. माजी आमदार केशवराव आंधळे, गोरक्ष रसाळ, श्रीमंतराव जायभाये, संजय तिडके, सुरेश वनवे, राणा डोईफोडे, दत्तोबा भांगे आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

   ऊसतोडणी मजूर व मुकादमाचा दरवाढीचा करार हंगाम सन २०२५-२६ ला संपलेला आहे. साखर संघाने पुढील दरवाढीचा करार करून नवीन दरवाढ सन २०२६-२७ पासून देण्यात यावी अशी संघटनेची मागणी आहे. ऊसतोडणी व वाहतूक तसेच बैलजोडी व वाहतूक मध्ये शंभर टक्के दरवाढ करावी यासह इतर विविध मागण्या संघटनेने ना. पंकजाताई मुंडे यांच्यासमोर मांडल्या. 'ताईसाहेब.. तुम्ही आमच्या लवादाच्या प्रमुख नेत्या आहात, आतापर्यंत मजूरांना कधी नव्हे ती  मोठी दरवाढ तुम्ही दिली. तुमच्याशिवाय दुसरं कोणीही ऊसतोड मजूरांना न्याय देऊ शकणार नाही, त्यामुळे आता देखील तुम्हीच न्याय द्या अशा भावना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. मी तुमच्या पाठिशी आहे, मागण्यांवर सकारात्मक विचार करू असं ना. पंकजाताईंनी शिष्टमंडळाला आश्वस्त केलं.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!