पोस्ट्स

ऑक्टोबर ११, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेख नजीर सर आणि डॉ. अखीला मॅडम यांच्या पुढाकाराने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा ....

इमेज
शिक्षकांचा सन्मान; शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण; डॉ. अन्सारी अबरार अहमद आणि डॉ. जावळे कीर्तिमालिनी विठ्ठलराव यांचा गौरव छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी :शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करण्यासोबतच शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संदेश देणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. १० ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर येथील बुरहानी नॅशनल स्कूलच्या परिसरात पार पडला. ऑल इंडिया उलमा बोर्ड एज्युकेशन विंगच्या वतीने आयोजित या सोहळ्यात डॉ. अन्सारी अबरार अहमद आणि डॉ. जावळे कीर्तिमालिनी विठ्ठलराव यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘मौलाना अबुल कलाम आझाद महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार’ आणि ‘क्रांतिकारी फातिमा शेख महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार’ या पुरस्कारांचे वितरण या वेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मखदूम फारुकी होते. ऑल इंडिया उलमा ब...