सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी; सकल मराठा समाजाचे निवेदन परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष भैय्या (जीवनराव) शिंदे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संतोष शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये दाखल करण्यात आलेला गुन्हा वस्तुस्थितीला धरून नसून संबंधित फिर्यादी व आरोपी यांच्यात पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सदर घटना ही किरकोळ मतभेदातून घडलेली असून, चोरी करणे किंवा गंभीर स्वरूपाची इजा पोहोचविणे असा कोणताही हेतू संतोष शिंदे यांचा नव्हता, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी पुढे म्हटले आहे की, सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या संतोष भैय्या शिंदे यांनी विविध सामाजिक उपक्रमांमधून परळी तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या...