पोस्ट्स

रंगतदार सामना व स्नेह भोजनाचा घेतला आस्वाद

इमेज
नव्वदच्या दशकातील परळीतील स्टार क्रिकेट खेळाडुंचे गेट टुगेदर रंगतदार सामना व स्नेह भोजनाचा घेतला आस्वाद  परळी प्रतिनिधी.      90 च्या दशकातील परळी शहरातील स्टार क्रिकेट खेळाडूंचे गेट-टुगेदर नुकतेच संपन्न झाले. शहरातील या खेळाडूंनी परत एकदा नव्या उत्साहाने क्रिकेटच्या मैदानावर उतरून एक रंगतदार सामना खेळला व जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला. क्रिकेट सामन्यानंतर क्रिकेट खेळाडू डिंपी भाटिया यांनी सर्व मित्रांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचाही सर्वांनी आस्वाद घेतला.     एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर तारुण्यात असताना अष्टपैलू कामगिरी करणारे परळी शहरातील 30 ते 40 खेळाडू   सुमारे 20 ते 25 वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र आले. डिंपी भाटिया ,नगरसेवक व उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती होती असे निळकंठ चाटे तसेच क्रीडाशिक्षक अजय जोशी व प्रसिद्ध पत्रकार व लेखक तसेच क्रिकेट खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेले रानबा गायकवाड यांनी एकत्र येऊन शहरातील सर्व जुन्या क्रिकेट खेळाडूंना एकत्रित आणले. त्या सर्व क्रिकेट खेळाडूंचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून सर...
इमेज
दुर्मिळ ‘संत जगमित्रनागा अभंग गाथे’चे  माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन अतिशय दुर्मिळ ठेवा असलेल्या या अभंग गाथेचा व्यापक प्रसार व्हावा- आ. धनंजय मुंडे परळी वैजनाथ | प्रतिनिधी      वारकरी संप्रदाय, संत साहित्य आणि अध्यात्मिक अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दुर्मिळ ‘संत जगमित्रनागा अभंग गाथे’चे प्रकाशन माजी मंत्री  आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीतील जगमित्र कार्यालयात संपन्न झाले.          संत साहित्याचे अभ्यासक व संत जगमित्र नागा चरित्र ग्रंथाचे लेखक ह भ प एड. दत्तात्रय आंधळे संपादित या गाथेमध्ये संत जगमित्रनागा यांच्या दुर्मिळ अभंगांचा समावेश करण्यात आला असून त्यांचा सोपा भावार्थही देण्यात आला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायातील अभ्यासक, कीर्तनकार, प्रवचनकार तसेच संत साहित्यप्रेमींसाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.       संत साहित्याचे अभ्यासक व साहित्यिक ॲड. दत्तात्रेय आंधळे यांनी या गाथेचे लेखन केले आहे. यापूर्वीही त्यांनी विविध चरित्रग्रंथ प्रकाशित केले असून संत साहित्य क्षेत्रात त्य...
इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
इमेज
Beed news | रेंगाळलेल्या रस्ता कामाची धूळ शेतात, पिकांची वाढच खुटंली, शेतकऱ्याने संतापून मिरची - पपईची झाडे उपटून टाकली! दिंद्रुड : बीड–परळी महामार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामामुळे उडणाऱ्या धुळीचा फटका रस्त्यालगतच्या शेतीला बसत असून, धारूर तालुक्यातील भोपा येथील एका शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्याने सोमवारी स्वतःच्या शेतातील पपई व मिरचीची उभी पिके अक्षरशः उपटून टाकली. बीड–परळी महामार्गाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, तिचा परिणाम रस्त्याशेजारील पिकांवर होत आहे. भोपा येथील शेतकरी रवी वाघचौरे यांनी सव्वा एकर क्षेत्रात मार्च महिन्यात पपई व मिरचीची लागवड केली होती. मात्र, रस्त्यावरील धूळ सतत पिकांवर साचत गेल्याने पिकांना विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. पिकांवर अनेक वेळा औषध फवारणी करूनही अपेक्षित परिणाम झाला नाही. धूळ पानांवर साचल्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. परिणामी पिकांची वाढ खुंटली आणि अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता कमी झाली. अखेर उत्पादनाची आशा संपुष्टात आल्याने श...
इमेज
  सेलु आणि लोणी गावच्या नागरिकांची रोडसाठी थेट मंत्रालयात धाव परळी वै., प्रतिनिधी ...- सेलु व लोणी गावच्या नागरिकांना रोडसाठी मंत्रालयात धाव घ्यावी लागली. अनेक दिवसांपासुन परळी-सेलु-बोंदरगाव व परळी-लोणी-दत्तवाडी हे दोन्ही ही रोड खड्डामय झाल्याने नागरिकांना खुपच त्रास होत आहे. मा. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पातील तरतूदीनुसार 1000 लोकसंख्या असलेली गावे सिमेंट रोडनी जोडून नागरिकांचा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे  दिनांक 04/02/2026 पासुन ग्राम पंचायत लोणी, ग्राम पंचायत सेलु व ओबीसी परिषद या रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मा. मुख्यमंत्री, ग्रामीण विकास मंत्री, रोजगार हमी मंत्री, पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री, पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद बीड इत्यादींना निवेदने दिली. अद्यापपावेतो रोड न झाल्याने थेट मंत्रालयात जावून दिनांक 05/06/2026 रोजी रोडची निवेदनाद्वारे व्यथा व्यथित करण्यात आली. संबंधीत खात्याने तुमचे काम प्राधान्याने करू असे आश्वासन दिले.  तेव्हा लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे नागरिकांचा जिव्हाळ्याचा व जीवनमरणाचा प्रश्न आहे परळी-सेलु...
इमेज
  विविध मागण्या संदर्भात ग्रामरोजगार सेवक बनसोडे यांचे चार दिवसापासून पंचायत समिती समोर उपोषण सुरू  कारवाई न झाल्यास  पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा  परळी प्रतिनिधी      तालुक्यातील दौनापूर ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सेवक कृष्णा बनसोडे यांचे परळी पंचायत समिती समोर गेल्या 5  दिवसांपासून विविध मागण्या संदर्भात आमरण उपोषण सुरू आहे .दरम्यान उपोषणकर्त्याला न्याय मिळाल्यास उद्या दिनांक 9  जून रोजी परळी पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.      याबाबत अधिक माहिती अशी की परळी तालुक्यातील दौनापूर येथील ग्रामपंचायत मध्ये ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत असलेले प्रश्न बनसोडे दिनांक 4 जून पासून परळी पंचायत समिती समोर उपोषणास बसले आहेत गेल्या एक वर्षापासून त्यांचा आयडी सरपंच ग्रामसेवक व तलाठी यांनी बंद केला आहे तो तात्काळ चालू करावा तसेच दौनापूर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक आणि परळी पंचायत समितीचे बांधकाम इंजिनिअर यांनी संगणमताने गावात कामे न करताच ...

दुःखद वार्ता....

इमेज
  व्यंकटराव निर्मळ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन सिरसाळा : हिवरा गोवर्धन येथील प्रतिष्ठित नागरिक तथा प्रगतिशील शेतकरी कै. व्यंकटराव अच्युतराव निर्मळ पाटील यांचे सोमवार दिनांक 8 जून रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर येथील येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्या मेंदूवर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे आणि सर्वांना अडीअडचणीत सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे व्यकटराव निर्मळ हे हिवरा गोवर्धन आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.सोमवारी सायंकाळी 5 वाजता व्यंकटराव निर्मळ पाटील यांच्या पार्थिवावर हिवरा गोवर्धन येथील स्मशानभूमीत दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी हिवरा गोवर्धन व परिसरातील सर्व स्तरातील प्रतिष्ठित आणि नामांकित मंडळी उपस्थित होती. माजी जिल्हा परिषद सदस्य वृक्षराज निर्मळ पाटील यांचे ते वडील होत तर भाजपचे परळी तालुका मंडळ अध्यक्ष वसंतराव निर्मळ पाटील यांचे ते चुलते होत. एमबी न्यूज परिवार निर्मळ पाटील परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.