दुःखद वार्ता....

 व्यंकटराव निर्मळ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन




सिरसाळा : हिवरा गोवर्धन येथील प्रतिष्ठित नागरिक तथा प्रगतिशील शेतकरी कै. व्यंकटराव अच्युतराव निर्मळ पाटील यांचे सोमवार दिनांक 8 जून रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर येथील येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्या मेंदूवर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे आणि सर्वांना अडीअडचणीत सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे व्यकटराव निर्मळ हे हिवरा गोवर्धन आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.सोमवारी सायंकाळी 5 वाजता व्यंकटराव निर्मळ पाटील यांच्या पार्थिवावर हिवरा गोवर्धन येथील स्मशानभूमीत दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी हिवरा गोवर्धन व परिसरातील सर्व स्तरातील प्रतिष्ठित आणि नामांकित मंडळी उपस्थित होती. माजी जिल्हा परिषद सदस्य वृक्षराज निर्मळ पाटील यांचे ते वडील होत तर भाजपचे परळी तालुका मंडळ अध्यक्ष वसंतराव निर्मळ पाटील यांचे ते चुलते होत. एमबी न्यूज परिवार निर्मळ पाटील परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!