विविध मागण्या संदर्भात ग्रामरोजगार सेवक बनसोडे यांचे चार दिवसापासून पंचायत समिती समोर उपोषण सुरू 




कारवाई न झाल्यास  पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा 

परळी प्रतिनिधी      तालुक्यातील दौनापूर ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सेवक कृष्णा बनसोडे यांचे परळी पंचायत समिती समोर गेल्या 5  दिवसांपासून विविध मागण्या संदर्भात आमरण उपोषण सुरू आहे .दरम्यान उपोषणकर्त्याला न्याय मिळाल्यास उद्या दिनांक 9  जून रोजी परळी पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की परळी तालुक्यातील दौनापूर येथील ग्रामपंचायत मध्ये ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत असलेले प्रश्न बनसोडे दिनांक 4 जून पासून परळी पंचायत समिती समोर उपोषणास बसले आहेत गेल्या एक वर्षापासून त्यांचा आयडी सरपंच ग्रामसेवक व तलाठी यांनी बंद केला आहे तो तात्काळ चालू करावा तसेच दौनापूर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक आणि परळी पंचायत समितीचे बांधकाम इंजिनिअर यांनी संगणमताने गावात कामे न करताच लाखो रुपये उचलले आहेत या कामाची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी दौनापूर गावात असलेली चावडी बेकायदेशीर रित्या पाडण्यात आलेली आहे याप्रकरणी त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी असे मागण्यासाठी बनसोडे यांनी कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्ते बनसोडे यांची प्रकृती खालवाल्याचे लक्षात आल्यानंतर विविध पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषण स्थळी धाव घेतली व गटविकास अधिकाऱ्यांशी नेते मंडळींनी चर्चा करून आक्रमक पवित्रा घेतला.

   या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव भास्कर नाना रोडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, युवा नेते प्रसेनजित रोडे,जिल्हा उपाध्यक्ष दशरथ आबा शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष राजेश सरवदे, सामाजिक कार्यकर्ते अंबादास रोडे, यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी यांनी भेट देऊन गट विकास अधिकारी भोसले, विस्तार अधिकारी भताने यांच्याशी चर्चा करून उपोषणकर्त्याच्या मागणी संदर्भात चर्चा केली असता या प्रश्नाची सोडवणूक करण्याची पंचायत समिती अधिकाऱ्यांमध्ये असमर्थता दिसून आली. आज सायंकाळपर्यंत उपोषणकर्त्याच्या मागणीची दखल घेऊन योग्य ती कारवाई न झाल्यास उद्या नऊ जून रोजी परळी पंचायत समितीला टाळे ठोकण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!