परळीतील आदर्श शिक्षक गोविंदराव (तात्या) भातलंवडे यांचे दुःखद निधन परळी वैजनाथ:( प्रतिनिधी) परळी शहरातील बालाजी मंदिर येथिल रहिवासी आणि आदर्श निवृत्त शिक्षक गोविंदराव (तात्या) भातलंवडे यांचे आज (दि. १४) सकाळी ११:३० वाजता त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते. गोविंदराव भातलंवडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांनंतर त्यांना परळी येथील राहत्या घरी आणण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ६:०० वाजता परळी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक, त्यांचे जुने सहकारी आणि त्यांचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. स्व. गोविंदराव भातलंवडे यांनी परळी तालुक्यात आपल्या अध्यापन कौशल्याचा एक वेगळा ठसा उमटवला होता. तालुक्यातील विविध शाळांमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावताना त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर त्यांच्या...