MB NEWS:आठ डिसेंबर रोजी परळी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत

 आठ डिसेंबर रोजी परळी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत


 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

    परळी तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय सरपंच पदाचे आरक्षण करण्यासाठी येत्या आठ डिसेंबर रोजी सोडत होणार आहे. याबाबतची अधिसूचना बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढली आहे.

     परळी तालुक्यातील ग्रामपंचायतीची संख्या नव्वद असून ग्रामपंचायत सरपंच पदाचे तालुकास्तरीय आरक्षण क्षण 2020 ते 20255 या कालावधीसाठी जिल्हास्तरावरून निर्धारित करण्यात आलेले आहे. परळी तालुक्यातील निर्धारित आरक्षण: अनुसूचित जातींसाठी एकूण 15 ग्रामपंचायत, अनुसूचित जमातींसाठी एकूण 12 ग्रामपंचायत, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 24 ग्रामपंचायत, खुल्या प्रवर्गासाठी एकूण 50 ग्रामपंचायत सरपंचपदे विविध प्रवर्गांसाठी आरक्षित होणार आहेत. यामध्ये ग्रामपंचायत निहाय आरक्षणाची सोडत काढून ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित केले जाणार आहे. दिनांक आठ डिसेंबर 2020 रोजी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालय येथे ही सोडत होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार