MB NEWS-पुजा चव्हाण प्रकरणात बहुचर्चित ठरलेल्या अरुण राठोडच्या घरात चोरी ! • कुटुंब घरी परत आल्यावर प्रकार आला निदर्शनास •

पुजा चव्हाण प्रकरणात बहुचर्चित ठरलेल्या अरुण राठोड च्या घरात चोरी !



• कुटुंब घरी परत आल्यावर प्रकार आला निदर्शनास •


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        पुणे येथे झालेल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्येप्रकरणी राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षानं हा मुद्दा उचलून धरला आहे. तर, राज्यातील महाविकास आघाडी आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकरणावर राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान पुजा चव्हाण प्रकरणात बहुचर्चित नाव अरुण राठोड याच्या घरात चोरी झाली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

      बाहेरगावी गेलेले अरुण राठोड याचे कुटुंब धारावती तांडा परळी येथे आज घरी आल्यानंतर त्यांना एकच धक्का बसला. घराच्या गेटचे लॉक तुटलेले होते, घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं त्याच्या कुटुंबीयांना दिसलं. कुटुंबीयांनी घराची झाडाझडती घेतल्यावर घरातून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं.येत्या २५ तारखेला अरुणच्या बहिणीचं लग्न होतं. याची तयारी म्हणून घरात लाखोंचा ऐवज होता अशी माहिती राठोड कुटुंबियांनी दिली. घरात लाखोंची चोरी झाल्याने राठोड कुटुंबीयांच्या संकटात वाढ झालेली दिसत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार