इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-दीनदयाळ नागरी बॅंकेवर पंकजाताई मुंडेंच्या पॅनलची पुनश्च एकहाती सत्ता* *"दीनदयाळ पॅनल"चे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी* *15 जागांकरिता झाली होती निवडणूक; पंकजाताईंसह चार उमेदवार अगोदरच आले होते बिनविरोध*

 

*दीनदयाळ नागरी बॅंकेवर  पंकजाताई मुंडेंच्या पॅनलची पुनश्च एकहाती सत्ता*

*"दीनदयाळ पॅनल"चे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी*

*15 जागांकरिता झाली होती निवडणूक; पंकजाताईंसह चार उमेदवार अगोदरच आले होते बिनविरोध*
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
   दीनदयाळ नागरी सहकारी बॅंकेवर भाजप राष्ट्रीय सचिव  पंकजाताई मुंडेंच्या पॅनलची पुनश्च एकहाती सत्ता आली आहे. "दीनदयाळ पॅनल"चे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी झाले आहेत.
     दीनदयाळ नागरी सहकारी बॅंकेच्या  संचालक मंडळाच्या 15 जागांकरिता निवडणूक झाली होती.यामध्ये पंकजाताईंसह चार उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित सर्व जागांसाठी मतदान झाले . यामध्ये सर्वच्या सर्व जागा दीनदयाळ पॅनलने जिंकल्या आहेत.विजयी झालेल्या उर्वरित उमेदवारांमध्ये कुलकर्णी मकरंद पांडुरंग, कोपले विजयकुमार शिवाजीराव, जाजू चैनसुख रामकिशन, देशपांडे बाळासाहेब सर्वोत्तमराव, देशमुख राजेश्वर वसंतराव, दंडे विवेक दिगंबरराव, धाटट राजाराम गोपाळराव, पत्की मकरंद माधवराव, लोमटे अशोक तुळशीराम, क्षिरसागर बिपिन माणिकराव, दहिवाळ राजाभाऊ रामभाऊ यांचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या