इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-राशिभविष्य (दि. ४ फेब्रुवारी २०२२)

  राशिभविष्य (दि. ४ फेब्रुवारी २०२२)



मेष-अनावश्यक खर्च होईल. परावलंबी स्वभावामुळे कामांत अडचणी येतील. तरच परिस्थिती सुधारेल. समज-गैरसमज होतील. स्पर्धा, ईर्ष्या मनःस्ताप देतील.


वृषभ-मनासारख्या घटना घडल्यामुळे दिवस आनंददायी असेल. लाभदायक दिवस. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल.


मिथुन-संकल्प पूर्णत्वाकडे जातील. मेहनत व चिकाटीला यश येईल. अधिकारांत वाढ होईल. मान-सन्मान मिळेल. गृहसौख्य उत्तम राहील.


कर्क-जुने रोग उद्भवतील. सरकारी कामांत अडचणी येतील. प्रतिकारशक्ती कमी होईल. अचानक खर्च उभे राहतील. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.


सिंह-पूर्वनियोजित कामांत अडचणी येतील. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. आत्मविश्वास कमी करणार्‍या घटना घडतील. मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नका.


कन्या- प्रेम-प्रणयाचा अनुभव येईल. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. प्रतिष्ठा लाभेल. कौटुंबिकद़ृष्ट्या सौख्यकारक दिवस.


तूळ- आरोग्य उत्तम राहील. आर्थिक गुंतवणूक लाभदायक ठरेल. शत्रू पीडा कमी होईल. सज्जन मित्रमंडळींची ओळख होईल. सौख्यकारक दिवस जाईल.


वृश्चिक-दुःखदायक घटनांचा अनुभव येईल. कामांत अडचणी येतील. निर्णय घेताना सावध राहा. अचानक खर्च उभे राहतील, प्रतिष्ठा पणाला लागेल.


धनु-अनावश्यक भीती आत्मविश्वास कमी करेल. पोटासंबंधित व्याधी निर्माण होतील. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. वादापासून दूर राहा.


मकर-चुरशीच्या कामांत जय मिळवाल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीत लाभ होतील. उत्तम वस्त्रांची खरेदी कराल. मैत्रीला जागाल. जीवलगांचा सहवास लाभेल.


कुंभ-आर्थिक अडचणी निर्माण होतील. कर्जदार तगादा लावतील. मानहानीचे प्रसंग मनःस्ताप देतील. नुकसानकारक दिवस. वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे.


मीन-भाग्यकारक घटनांमुळे प्रसन्नता मिळेल. सुग्रास भोजनाचा लाभ घ्याल. उंची वस्त्र व अलंकारांचा लाभ होईल. सुवार्ता ऐकायला मिळेल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!