प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:वैद्यनाथ कारखान्याचे संचालक दत्ताभाऊ देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

 वैद्यनाथ कारखान्याचे संचालक दत्ताभाऊ देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, ॲड.राजेश्वर चव्हाण यांची उपस्थिती

परळी (दि. 23) - भाजपचे नेते माजी नगरसेवक तथा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक,परळी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री.दत्ताभाऊ देशमुख यांनी आज माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.

       राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री जयसिंगकाका गायकवाड, राष्ट्रवादी बीड जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर आबा चव्हाण, राष्ट्रवादीचे युवक नेते अजयजी मुंडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, परळी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दत्ताभाऊ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेशअण्णा टाक,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैजनाथ सोळंके,युवक तालुकाध्यक्ष गोविंद कराड,राष्ट्रवादी महिला काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष संगीताताई तुपसागर,महिला आघाडी शहराध्यक्षा सोफियाताई नंबरदार,युवती आघाडी शहराध्यक्षा वर्षाताई दहिफळे, तालुकाध्यक्षा शिल्पाताई मुंडे,रामेश्वर महाराज कोकाटे,अय्युब खान पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या