इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:महाराष्ट्र विद्यालयाचा एच.एस.सी परीक्षेत ही डंका ;उच्च माध्यमिक विभागाचा 98.63 % निकाल

 महाराष्ट्र विद्यालयाचा एच.एस.सी परीक्षेत ही डंका ;उच्च माध्यमिक विभागाचा 98.63 % निकाल


परळी / प्रतिनिधी


ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या परळी तालुक्यातील महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाने आपली गुणवत्ता पुन्हा एकवेळ सिद्ध करून दाखवली आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या एच.एस.सी 2023 बोर्ड परीक्षेत उच्च माध्यमिक विभागाचा 98.63 टक्के निकाल लागला आहे.


गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळख असलेल्या मोहा येथील महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय सातत्याने आपली गुणवत्ता सिद्ध करत असून विविध स्पर्धा परीक्षा असो की बोर्ड परीक्षा शाळेचा उत्कृष्ट निकालाचा चढता आलेख कायम आहे.नुकताच जाहीर झालेला एच.एस.सी 23 बोर्ड परीक्षेत उच्च माध्यमिक विभागाचा 98.63 टक्के निकाल लागला असून कला आणि विज्ञान शाखेतील तब्बल 22 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी, 112 विद्यार्थी प्रथम श्रेणी तर 11 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.


विद्यार्थी आणि शाळेच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा चे सचिव, संचालक मंडळ यांनी शाळेचे प्राचार्य, उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख, सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या