युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘पदवी’ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘पदवी’ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मार्च-एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल आज गुरूवारी जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी यांनी दिली.


कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा घेण्यात आल्या तसेच मुल्यांकन प्रक्रिया पार पाडली. यामध्ये बी.ए, बी.एस्सी, व बी.कॉम अभ्यासक्रमाचा निकाल आज गुरुवारी घोषित करण्यात आला. तसेच उर्वरित अभ्यासक्रमांचे निकालही घोषित करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि जालना या चार जिल्ह्यात मिळून 23 केंद्रावर मुल्यांकन करण्यात आले. पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा व धाराशिव उपपरिसर या दोन्ही ठिकाणी मुल्यांकनाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या