अल्पवयीन मुलीस विवस्त्र करत कुटुंबियांना मारहाण



परळी तालुक्यातील घटना ;गुन्हा दाखल 


परळी / प्रतिनिधी


अल्पवयीन मुलीचे कपडे फाडत कुटुंबातील सदस्यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना परळी तालुक्यात सारडगाव येथे समोर आली असून प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील सारडगाव येथील भावकीतील वादातून सोमवार दि 16 रोजी सकाळी 7:30 च्या सुमारास  गावातील सर्वे नंबर 409 मध्ये  यशवंत सोमाजी गवळी, श्रीराम सोमाजी गवळी, प्रशांत श्रीराम गवळी व ओमकेश श्रीराम गवळी (सर्व रा. सारडगाव ) यांनी संगनमत करून अंतोबा बाबू गवळी यांच्या शेतात जाऊन त्यांना फिर्यादी चा भाऊ सुधिर व आई रुक्मीण हिस शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने, लाथाबुक्यांने मारहाण करत अंतोबा गवळी यांची  पुतणी ही अल्पवयीन आहे हे माहित असुनही अरोपी ओमकेश याने तिच्या अंगावर बसुन तिचा पंजाबी टॉप फाडुन तिस उघडी करण्याचा प्रयत्न करत इतरांनी लाकडी दांड्यांनी व लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकरणी अंतोबा गवळी यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन. 269/2025-कलम 76,118 (1), 115(2),352,351(2),351 (3), 3 (5) BNS सह कलम 8 पोस्को प्रमाणे चार व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक शेख हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार