प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

' अनंतपुत्र ' अनंतात विलीन....!

अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये मंत्रोच्चारात विधिवत अंत्यसंस्कार, नेते आणि कार्यकर्त्यांनी वाहिली श्रद्धांजली






अजित पवार यांचं काल सकाळी ( 28 जानेवारी) विमान अपघातात निधन झालं. आज सकाळी 9.50 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस काटेवाडी येथून सुरुवात झाली.  त्यांचे पार्थिव बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात 11 वाजता अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. त्यांचे पुत्र पार्थ आणि जय यांनी त्यांच्यावर मंत्रोच्चारात व विधिवत अंत्यसंस्कार केले.


अजित पवार यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे सर्व पवार कुटुंबीय, मंत्री तसेच विविध पक्षाचे नेते, आमदार, कार्यकर्तेही उपस्थित होते.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे व उद्धव ठाकरे तसेच मंत्रिमंडळातील इतर सदस्य बारामतीमध्ये उपस्थित होते.

       काल बारामती विमानतळावर उतरताना धावपट्टीजवळच विमानाला अपघात झाला. खाली कोसळताच विमानाने पेट घेतला. सकाळी 8:44 वाजता हा अपघात झाला. या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला.   अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय दिल्लीहून बारामतीच्या दाखल झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारही मुंबईतून बारामतीला पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बारामती येथे धाव घेत पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यात आला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, खासदार शाहू छत्रपती राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ,  विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश, राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे, खासदार अशोक चव्हाण ,आमदार सरोज अहिरे, आमदार नमिता मुंदडा, राणा जगजितसिंह, झिशान सिद्दीकी, अनिल देशमुख, सुरज चव्हाण, अमोल मिटकरी, नरेश अरोरा, सचिन अहिर, खासदार श्रीकांत शिंदे, संजय राठोड, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, मंगल प्रभात लोढा, आशिष जयस्वाल, श्रीरंग बारणे, खासदार बजरंग सोनावणे, संजय दीना पाटील, माणिकराव कोकाटे, अभिनेता रितेश देशमुख, खासदार अमोल कोल्हे, राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सुरेश धस, विजय शिवतारे, दत्ता मामा भरणे, माजी खासदार प्रीतम मुंडे, राज्याचे मंत्री गिरीश महाजन, काँग्रेस नेते सुशीरकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांनीही वाहिली अजित पवारांना श्रद्धांजली.

महाराष्ट्राचे लाडके दादा, अजित पवार यांच्या पार्थिवावर अखेर अंत्यसंस्कार पूर्ण झाले आहेत. त्यांचा शेवटता निरोप घेण्यासाठी कार्यकर्त्यांसह दिग्गज नेत्यांची मोठी गर्दी लोटली.शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला असून कार्यकर्ते यादरम्यान ढसाढसा रडताना दिसले.अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यावेळी अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे लोक राज्यभरातून बारामतीत आले. लाखोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. पार्थ पवार आणि जय पवार यांनी या लोकांना हात जोडले.अजित पवार यांच्या जाण्याने संपूर्ण राज्य दु:खात आहे. शोककळा पसरली असून कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. आज अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला.अजित पवार अनंतात विलिन झाले असून कार्यकर्त्ये भावूक झाल्याचे बघायला मिळत आहे. अजित दादा परत या… म्हणून कार्यकर्ते टाहो फोडताना दिसत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या