भावपूर्ण श्रद्धांजली...

 परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ मंदिर चे ज्येष्ठ पुरोहित सुरेश (बाबुदेव) नव्हाडे यांचे निधन




परळी वैजनाथ: प्रतिनिधी...

   येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरातील ज्येष्ठ क्षेत्रोपाध्याय श्री सुरेश (बाबुदेव) नव्हाडे (वय ७० वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले आहे.

अत्यंत मनमिळावू, सुस्वभावी आणि वेदशास्त्र संपन्न पुरोहित म्हणून त्यांची संपूर्ण परिसरात ओळख होती. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी वैद्यनाथ चरणी पूजा पाठ करून पौरोहित्य करत आपली सेवा अर्पण केली.त्यांच्या पार्थिवावर परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने नव्हाडे कुटुंबावर आणि पुरोहित वर्गावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे, भाऊ, पुतणे, सुना असा मोठा परिवार आहे. नव्हाडे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!