भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन...

संत सोपानकाका मंदिरात महाशिवरात्री महोत्सवा निमित्त ; शिवपुराण कथा व शिवलीला अमृत पारायण सोहळ्याचे आयोजन 





परळी / प्रतिनिधी 

       येथील श्री संत सोपान काका मंदिरात महाशिवरात्री महोत्सवानिमित्त शिवम महापुराण कथा व शिवलीला अमृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून श्री ह भ प मारुती महाराज लातूरकर यांच्या मधुर वाणीतून शिवपुराण कथेचे श्रवण करण्याचा योग परळीकरांना आला आहे तरी परळी पंचक्रोशीतील भाविकांनी या शिवप्राण कथा व शिवलीला अमृत पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा तसेच जास्तीत जास्त भाविकांनी पारायण सोहळ्यास बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहनही उखळीकर फडाच्या वतीने करण्यात आले आहे. 

      दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त श्री संत सोपान काका मंदिरात दिनांक 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान शिवपुराण कथा व शिवलीला अमृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे लातूर येथील प्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य व शिवपुराण कथाकार ह भ प मारुती महाराज लातूरकर यांची उपस्थिती लाभणार असून दुपारी 2 ते 5 या दरम्यान कथेचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या मधुर वाणीतून परळीकरांना प्रथमच या कथेचे श्रवण करण्याचा योग आला आहे. तसेच कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून 12 फेब्रुवारी रोजी रात्री 8 ते 10 या वेळेत ह भ प भागवताचार्य सुरेंद्र महाराज उखळीकर यांचे तर दिनांक 13 फेब्रुवारी रोजी हभप भागवताचार्य बाळासाहेब महाराज लटपटे, दिनांक 14 फेब्रुवारी रोजी ह भ प लक्ष्मण महाराज कुंडगीर , दिनांक 15 फेब्रुवारी रोजी ह भ प माधव महाराज उखळीकर शिवरात्री निमित्त रात्री दहा ते बारा यादरम्यान कीर्तन आयोजित करण्यात आले आहे तसेच  सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी ह भ प चैतन्य महाराज उखळीकर यांचे दुपारी 11 ते 1 काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल. तरी परळी पंचक्रोशीतील भाविकांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री संत सोपान काका महाराज मंदिर उखळीकर भजनी फड परळी वैजनाथ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार