ज्ञानेश्वर राजमाने यांची मागणी

इमेज
  परळी नगरपालिकेनेच दिली घरपट्टी-पाणीपट्टीची बेबाकी; मग थकबाकी कशी? ‘बेबाकी देणाऱ्यां मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करा’ — ज्ञानेश्वर राजमाने यांची मागणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी):घरपट्टी व पाणीपट्टीची अधिकृत बेबाकी स्वतः परळी नगरपालिकेने दिल्यानंतरही संबंधित नागरिकांना थकबाकीच्या नोटिसा बजावण्यात आल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. “बेबाकी नगरपालिकेनेच दिली कशी, मग आज अचानक बाकी कशी?” असा थेट प्रश्न ज्ञानेश्वर राजमाने यांनी उपस्थित केला आहे.     नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम नियमानुसार भरल्यानंतर ‘बेबाकी’ दाखले मिळाले होते. मात्र काही दिवसांतच त्याच खात्यांवर थकबाकी दाखवण्यात आली. या विसंगतीमुळे परळी नगरपरिषद प्रशासनातील अनागोंदी कारभारावर आणि कामकाजावर असंख्य प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परळी नगरपरिषद प्रशासनानेच दिलेल्या बेबाकीची नोंद कशाच्या आधारावर करण्यात आली? संबंधित अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नियमांची पडताळणी केली होती का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी ज्ञानेश्वर राजमाने यांनी केली आहे. ज्ञानेश्वर राजम...

धम्म उपासकांनी सहभागी व्हावे - तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण यांचे आवाहन

 चांदापुर येथे ७ मार्च शनिवार रोजी १२ व्या धम्म परिषदेचे आयोजन



धम्म उपासकांनी सहभागी व्हावे - तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण यांचे आवाहन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर (तिर्थक्षेत्र दर्जा - क प्राप्त) येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी बाराव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेचे उद्घाटन अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष पुज्य भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो (पुर्णा) यांच्या हस्ते होत असलेल्या धम्म परिषदेत तर विशेष अतिथी म्हणून पुज्य भिक्खू करूणानंद महाथेरो (संचालक, द ग्रेट हॅपिनेस चॅनल, छत्रपती संभाजीनगर), पुज्य भिक्खू महाविरो (काळेगाव, अहमदपुर), पुज्य भिक्खू पय्यानंद (लातूर) पुज्य भिक्खू धम्मशील (हिंगोली, बीड) आणि पुज्य भिक्खू धम्मसार (किल्लारी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी, चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.   जास्तीत जास्त  उपासकांनी लाभ  घ्यावा असे आवाहन धम्म परिषदेचे कार्यवाह  ऍड.अनंतराव जगतकर यांनी केले आहे.

      तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण, चांदापूर, जेतवन (ता.परळी, जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी, वसंतनगर तांडा, मौजे चांदापूर, ता.परळी येथे शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी येथे बाराव्या बौद्ध धम्म परिषदेत प्रारंभी सकाळी ९ वाजता पंचरंगी धम्म ध्वजारोहण होईल. तर परिषदेची सुरूवात सकाळी ११ वाजता होईल. या परिषदेस भिक्खु करूणानंद महाथेरो, पु.भिक्खु महावीरो, पु.भिक्खु पय्यानंद, पु.भिक्खु धम्मशील, पु.भिक्खु धम्मसार यांचे बहुमोल धम्ममार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या प्रवचनातून धम्म, समता, बंधुता आणि करूणेचा संदेश समाजात अधिक दृढ होणार आहे. या धम्म परिषदेत ना.संजय सिरसाट (मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय, मुंबई.), आमदार धनंजय मुंडे (परळी विधानसभा मतदारसंघ), ना.संजय बनसोडे (मंत्री तथा आमदार, उदगीर विधानसभा मतदारसंघ), संजय दौंड (माजी विधान परिषद सदस्य), ऍड.अनंतराव जगतकर आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तर यावेळी डी.आर.नरसिंगे (लातूर), सतिश बनसोडे सह.दुय्यम निबंधक, सेलू परभणी), डॉ.डी.टी.गायकवाड (पुणे), ले.कर्नल डॉ.एम.एच.कांबळे (अंबाजोगाई), डॉ.राजेश इंगोले (सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ), संग्राम गित्ते (सरपंच, चांदापूर), सौ.शाहू विजय राठोड (सरपंच, वसंतनगर तांडा), प्रा.डॉ मधुकर खळगे (प्राचार्य, कृषी महाविद्यालय), आनंद तुपसमुद्रे (बौद्धाचार्य, परळी वै.), मिलिंद नरबागे (परळी वै.), श्रावण बनसोडे (बोधेगाव), महादेव बनसोडे (नागापूर), आनंद वाघमारे (समाजभूषण, पट्टीवडगाव), प्रशांत गित्ते (चांदापूर), सुरेश मिसाळ (घाटनांदूर), संतोष रोडे (उपमुख्याधिकारी, न.प.परळी वै.) आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती परिषदेला लाभणार आहे. या प्रसंगी सरोजाताई गौतम डावरे, अर्चनाताई महेंद्र रोडे, नितीन नामदेव रोडे, महादेव नागनाथ रोडे, कविताताई अनंत इंगळे, कार्तिक भाऊसाहेब कांबळे तसेच परळी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक - नगरसेविका यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. ज्या उपासकांना धम्म परीषदेला उपस्थित रहावयाचे आहे. त्या धम्म उपासकांनी पांढरे वस्त्र परिधान करूनच धम्म परिषदेत सहभागी व्हावे तसेच वसंतनगर तांडा, चांदापूर (ता.परळी वैजेनाथ) या ठिकाणी धम्म परिषदेस येताना पुस - नंदागौळ - वसंतनगर तांडा ते बौद्ध विहार व परळी वैजनाथ - वसंतनगर तांडा ते बौद्ध विहार मार्गेच यावे. असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन (ता.परळी वै.,जि.बीड) चे पदाधिकारी चंद्रकांत इंगळे, प्रा.प्रदीप रोडे, राजेंद्र घोडके, राहुल घोडके, उपप्राचार्य प्रा.गौतम गायकवाड, प्रा.डॉ.विनोद जगतकर, सचिन वाघमारे, जगन सरवदे, विश्वनाथ भालेराव, सीमाताई इंगळे, दत्ता सरवदे, निलकांत हजारे, अर्जुन काळे, प्रा.बालाजी जगतकर, सचिन रणखांबे, व्यंकट वाघमारे, डॉ.बबन मस्के, मनिषा पांडुरंग पाखरे, समाधान तरकसे, चंद्रकांत बनसोडे, सुभाष ताटे, प्रज्ञा इंगोले, वर्षा गायकवाड, मंजुश्री मधुकर कांबळे, राजीव हजारे, पंकज भटकर, मिलिंद शिंदे, सुभाष वाघमारे, राज जगतकर  आकाश वेडे हे प्रयत्न करीत आहेत. बारावी बौद्ध धम्म परिषद ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक जागृती, समता आणि बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचा प्रसार करणारा प्रेरणादायी सोहळा ठरणार आहे. ही बौद्ध धम्म परिषद अत्यंत भव्य आणि प्रेरणादायी स्वरूपात आयोजित करण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसर धम्ममय वातावरणाने नटणार असून हजारो धम्मप्रेमी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तरी या ऐतिहासिक बौध्द धम्म परिषदेेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमास या विभागातील बौद्ध उपासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

======================

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....