उपस्थित राहण्याचे आवाहन...

 परळीत उद्या स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन





परळी वैजनाथ: प्रतिनिधी 
हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त उद्या, गुरुवार दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी परळी शहरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
      स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, औद्योगिक वसाहत कार्यालयासमोर उद्या (२६ फेब्रुवारी) रोजी सायंकाळी ५:३० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. याप्रसंगी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना सामूहिक अभिवादन करण्यात येणार आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्व सावरकरप्रेमींनी या अभिवादन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार