इमेज
  ८० पेक्षा अधिक स्पर्धकांतून आनंद वाव्हळे ठरले अव्वल गायक पुणे (खराडी): दिनांक ५ एप्रिल २०२६, रविवार रोजी सारनाथ बुद्ध विहार, खराडी (पुणे) येथे मराठी/हिंदी गीत गायन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सदर स्पर्धा कराओके ट्रॅकवर आधारित असून पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील विविध भागांतून ८० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली असून प्रत्येक स्पर्धकाने आपली गायनकला प्रभावीपणे सादर केली. या स्पर्धेत आनंद वाव्हळे यांनी आपल्या सुरेल आणि प्रभावी गायनाने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अनुराधा डंबाळे यांनी मिळवला, तर प्रसाद उलांडे आणि गोविंद कांबळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या आनंद वाव्हळे यांचा सारनाथ बुद्ध विहार येथील महिला संघाच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांचे प्राचार्य अनिल शिंदे व प्राध्यापिका शुभांगी शिंदे, यश भोरे ,किशोर भोरे व अनंत पवार ,रणजीत गोदाम,अंकुश सावंत ,नितीन मोहिते रामेश्वर बचाटे व शेखर जाधव यांनी कौतुक करून पुढील वा...

प्रभारी मुख्य अभियंता महेश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सहाय्यक अभियंता सुभाष पसारे यांचा निरोप समारंभ 



प्रभारी मुख्य अभियंता महेश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

परळी / प्रतिनिधी:

    औष्णिक विद्युत केंद्र, परळी येथील कोळसा हाताळी विभागातील वाहन दुरुस्ती विभाग-१ चे सहाय्यक अभियंता सुभाष आनंदराव पसारे यांना २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता प्रशासकीय कार्यालयातील सभागृहात आयोजित सेवापूर्ती कार्यक्रमात निरोप देण्यात आला. श्री. पसारे यांनी परळी येथे महाजनकोला एकूण २७ वर्षे सेवा दिली. त्यांना दोन मुले असून, त्यांचा मुलगा आदित्य याने बी.टेक. पूर्ण केले आहे. या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा प्रभारी मुख्य अभियंता महेश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना महेश महाजन म्हणाले की, "प्रत्येकाने आपल्या कर्तव्यासोबतच सामाजिक आणि कौटुंबिक बांधिलकी जोपासली पाहिजे." प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार यावेळी बोलताना म्हणाले की, "माणुसकीचा भाव जोपासणारे तसेच खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारे, अशी सुभाष पसारे यांची ओळख होती." या निरोप समारंभास प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, अधीक्षक अभियंता धनंजय कोकाटे, अधीक्षक अभियंता सुरेश गर्जे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता शाहूराव होते, कार्यकारी अभियंता मदन पवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आरोले, उपकार्यकारी अभियंता शिवाजी होटकर, कुंदन राठोड, वाघ, तसेच मानव संसाधन विभागाचे महादेव वंजारे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर, पारस, भुसावळ आणि नागपूर या ठिकाणांहून त्यांचे मित्र व सहकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या जीवनप्रवासावर आधारित एक चित्रफीत दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू गजले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....