इमेज
  माणिकनगर येथे आज पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसादाचे आयोजन परळी/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील माणिक नगर, शास्त्री नगर परिसरातील महारुद्र संस्थान येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त आज सोमवार दिनांक 15 जुन रोजी दुपारी 4 ते 6 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात सुरू असलेल्या या पवित्र सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा लाभ मिळत आहे.या निमित्ताने आज सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम महारुद्र संस्थान, माणिक नगर, शास्त्री नगर, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समिती, महारुद्र संस्थान यांच्या वतीने करण्यात ...

 परळी लोकन्यायालयात प्रकरणे 86 प्रकरणे तडजोडीने निकाली




परळी वैजनाथ 

परळी तालुका विधी सेवा समिती व परळी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी तथा विविध बँका पतसंस्था महावितरण  इत्यादी संस्था यांचे प्रकरणे  सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली. 

दिनांक 14 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या लोक अदालतीत दाखल पूर्व 24 व प्रलंबित प्रकरणे 62 मिळून 86 प्रकरणे निकाली निघाली आणि एकूण रक्कम वसुली 68 लाख 85 हजार 284  रुपयांची बँक पतसंस्था यांची वसुली झाली आहे .सदर लोकन्यायालयात पंच म्हणून परळी न्यायालयाचे न्या डि आर बोर्डे न्या डि वाय रायरीकर ॲड व्हि डी धुमाळ ॲड व्हि एम जगतकर यांनी काम पाहिले.सदर लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी न्या परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड डि बी कडबाने ॲड आर.व्हि.गित्ते अँड प्रदिप गिराम ॲड आर व्हि देशमुख ॲड मिर्झा मंजुर अली ॲड.माधवराव मुंडे ॲड वैजनाथ नागरगोजे ॲड दिलीप स्वामी ॲड प्रभाकर सातभाई ॲड वसंतराव फड उपाध्यक्ष ॲड धनाजी कांबळे सचिव ॲड विलास बडे ॲड डि.एल.उजगरे.ॲड

नागापूरकर ॲड जीवनराव देशमुख  ॲड गजानन पारेकर ॲड लक्ष्मीकांत मुंडे ॲड मोहन कराड ॲड लक्षमण अघाव ॲड कल्याण सटाले ॲड मार्तँड शिंदे ॲड लक्षमण गित्ते  ॲड आशिष पोतदार ॲड जगन्नाथ आंधळे ॲड दत्ता कराड ॲड ज्ञानोबा मुंडे ॲड ॲड वाय आर सय्यद सुनिल सोनपीर ॲड दिनकर वाघमोडे ॲड संजय डिघोळे ॲड सोपान मुंडे ॲड दतात्रय जाधवर ॲड आबा सोळंके ॲड केशव अघाव ॲड शाकेर सय्यद ॲड पुनम पाळवदे सहाय्यक अधीक्षक गिरीधर जोशी हाश्मी गणेश कलशेटे बडगिरे सुंदर मुंडे अमित गजबार कृष्णा कळसदकर सचिन कळसकर जयराम गंगणे अविनाश चौधरी लघुलेखक  गुप्ता सह वैद्यनाथ बँकेचे वसुली अधिकारी राहुल गोपणपाळे रघुनाथ फड सचिन गुट्टे व इतर बँकाचे अधिकारी तथा परळी पोलीस वाहतूक शाखेचे अधिकारी तथा कर्मचारी दैनिक न्याय टाईम्सचे संपादक बालकिशन सोनी ईत्यादी यांनी सहभाग घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या