परळी वैजनाथ रेल्वे स्थानकात अपघात; इंजिनखाली आल्याने व्यक्तीचा हात तुटला




परळी वैजनाथ : शहरातील रेल्वे स्थानकात सोमवारी (दि. ३०) सायंकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. चालत्या रेल्वेगाडीखाली तोल जाऊन पडलेल्या व्यक्तीचा हात अक्षरशः तुटल्याची धक्कादायक घटना उड्डाण पुलाच्या दिशेकडील फलाट क्रमांक २ च्या अखेरीस घडली.

          मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ तुकाराम भालेराव (वय ४७, रा. चाकूर, जि. लातूर) हे रेल्वे स्थानक परिसरात असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते चालत्या रेल्वे इंजिनखाली अडकले. या अपघातात त्यांच्या उजव्या हातावरून इंजिन गेल्याने हात पूर्णपणे तुटून बाजूला पडला.घटनेच्या वेळी रेल्वे पोलीस ठाण्याचे कर्मचारी टीमकीकर व सातपुते हे गस्तीवर होते. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला बाहेर काढले व तातडीने उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथे उपचारासाठी दाखल केले.

     प्राथमिक उपचारानंतर जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार