● कोण आहेत जगद्गुरू परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी ?

म्हैसूर मठाचे पीठाधिपती, जगद्गुरू परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांचे आज वैद्यनाथ नगरीत होणार आगमन

परळीत अध्यात्मिक पर्वणी, दिव्य दर्शन योग: भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –
        येडतोर येथील श्री योगानंदेश्वर सरस्वती मठ, म्हैसूरचे पीठाधिपती जगद्गुरू परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांच्या आगमनानिमित्त परळी वैजनाथ येथे आज दि.२३ रोजी अध्यात्मिक पर्वणी व दिव्य दर्शन योग  घडणार आहे. यानिमित्त स्वागत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सर्व धर्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सकल हिंदू समाज, परळी वैजनाथ’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

       शृंगेरी शारदापीठाच्या अद्वैत परंपरेतील या महान विभूतींचे सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता परळी वैजनाथ येथे आगमन होणार आहे. आगमनानंतर ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिर येथे विधीवत पूजा व दर्शन घेणार आहेत. महास्वामीजींच्या स्वागतासाठी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून संत जगमित्र नागा मंदिर ते वैद्यनाथ मंदिर अशी स्वागत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमाच्या निमित्ताने अद्वैत वेदांत विचारांची प्रेरणा तसेच आध्यात्मिक उर्जा मिळणार असून भाविकांसाठी हा एक अनमोल क्षण ठरणार आहे. महास्वामीजींच्या सानिध्यात धर्म, संस्कृती आणि अध्यात्म यांचा संगम अनुभवण्याची संधी लाभणार आहे. सर्व धर्मप्रेमी नागरिक ,भाविकांनी दुपारी ३.३० वाजता संत जगमित्र नागा मंदिर येथे एकत्रित येऊन स्वागत सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन ‘सकल हिंदू समाज, परळी वैजनाथ’ यांच्या वतीने  करण्यात आले  आहे.

● कोण आहेत जगद्गुरू परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी ?

     येडतोर श्री योगानंदेश्वर सरस्वती मठ हे प्राचीन आध्यात्मिक केंद्र असून सनातन परंपरा आणि वेदांत शिक्षणासाठी देशभर प्रसिद्ध आहे. हा मठ शृंगेरी शारदा पीठाच्या परंपरेशी संबंधित मानला जातो आणि अद्वैत वेदांताच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत आहे.वेद, उपनिषदे आणि अद्वैत तत्त्वज्ञान यांचा प्रसार करणे हे त्यांच्या कार्याचे मुख्य ध्येय आहे.देशभर प्रवास करून ते धर्मजागृती, संस्कार आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करतात.त्यांच्या प्रवचनांमध्ये जीवनमूल्ये, साधना, आणि आत्मज्ञान यांवर विशेष भर असतो.समाजात धर्म, संस्कृती आणि नैतिक मूल्ये टिकवण्यासाठी ते कार्यरत आहेत. जगद्गुरू परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांच्या सानिध्यातून सकारात्मक ऊर्जा व आध्यात्मिक प्रेरणा मिळते, अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे. ते सध्या बीड येथे रामोत्सव सोहळ्यानिमित्त आलेले आहेत. महास्वामीजी यांचे दुपारी सुमारे ३.३० वाजता परळी वैजनाथ येथे आगमन होणार आहे. आगमनानंतर बारा ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिर येथे ते विधीवत पूजा व दर्शन घेणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!