प्रेस कामगार रामभाऊ मुळाटे यांना मातृशोक

इमेज
  श्रीमती मैनाबाई मुळाटे यांचे निधन; आज अंत्यसंस्कार प्रेस कामगार रामभाऊ मुळाटे यांना मातृशोक परळी वैजनाथ :  परळी शहरातील जुने प्रेस कामगार रामभाऊ मुळाटे यांच्या मातोश्री तथा वैद्यनाथ गल्ली, परळी वैजनाथ येथील रहिवासी (सध्या मुक्काम योगेश्वरी कॉलेजच्या पाठीमागे, अंबाजोगाई) श्रीमती मैनाबाई वीरभद्र मुळाटे वय 88 वर्ष यांचे आज दिनांक ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ४ वाजता बोरुळ तलाव येथे करण्यात येणार आहे. श्रीमती मैनाबाई मुळाटे या अत्यंत प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या असल्यामुळे परिसरात सर्वपरिचित होत्या. कोष्टी समाजाच्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांत त्या सक्रिय सहभाग घेत असत. पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी त्या नित्यनेमाने जात असत, अशी त्यांची धार्मिक वृत्ती होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पहिली पंगत महिलांची!...

नाथ्रा गावात साजरा होतो लेकींचा सप्ताह, सर्व जाती - धर्मातील लेकींचा सहभाग आदर्शवत!



तीन पिढ्यातील विविध जाती - धर्माच्या लेकींच्या सहयोगातून नाथ्रा गावातील सप्ताहाची सांगता; धनुभाऊ - पंकजाताई उपस्थित

परळी (प्रतिनिधी) - नाथ्रा गावातील तीन पिढ्यातील हिंदू सह, मुस्लिम, दलीत आदी सर्व जाती - धर्मातील लेकींनी एकत्र येऊन आपल्या सर्वांच्या सहयोगातून आयोजित केलेला भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आज संपन्न आला. एकीकडे समाजात जाती - धर्मातील तेढ वाढवणाऱ्या घटना घडत असताना, एका गावातील सर्व जाती - धर्मातील लेकींनी एकत्र येऊन आयोजन केलेला हा सप्ताह आदर्शवत आहे.

या सप्ताहाचे हे दुसरे वर्ष होते. गावात राहणाऱ्या किंवा विवाहानंतर अन्यत्र स्थापित झालेल्या सर्व लेकींनी यासाठी वर्गणी दिली असून, काही कारणांनी ज्या लेकी सप्ताहास येऊ शकल्या नाहीत, त्यांनीही आपली वर्गणी पाठवली, हे विशेष!

या परंपरेला जपणाऱ्या गावातील सर्व  बहिणींचे विशेष कौतुक व अभिनंदन करतो, असे गौरवोद्गार माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी नाथ्रा गावातील अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभात बोलताना काढले आहेत. 

माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे जन्मगाव असलेल्या नाथ्रा या गावात गावातील सर्व कन्यांच्या सहयोगातून एकत्रित वर्गणी करून हा विशेष सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हिंदू, मुस्लीम, दलीत आदी सर्वच कुटुंबातील कन्यांचा समावेश हे कौतुकास्पद व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे असल्याचे धनंजय मुंडे बोलताना म्हणाले. तसेच या सप्ताहासाठी गावात आलेल्या तीन पिढ्यातील सर्व लेकींचे आपण मनापासून स्वागत व अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले. 

गावची कन्या म्हणून या सोहळ्यात सहभागी झाल्याचा विशेष आनंद असून, गावातील कन्या या कर्तबगार असल्याचे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आवर्जून नमूद केले.

पहिली पंगत महिलांची!

अनेक सार्वजनिक कार्यक्रम, सप्ताह, विवाह सोहळे अशा ठिकाणी जेवणावळीच्या पंगतीला प्रथम प्राधान्य असते मात्र नाथरा गावातील या सप्ताहाच्या वेळी पहिल्या पंगतीचा मान हा महिलांना दिला गेला, हे विशेष!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!