#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही नसल्याने चोरांना रान मोकळे...

परळी बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट; एस.टी. निवृत्त चालकाचे २५ हजार लंपास


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, याच पार्श्वभूमीवर एका निवृत्त एस.टी. चालकाला चोरट्यांनी गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

विठ्ठल संतराम फड (वय ६४, रा. मरळवाडी ता. परळी वैजनाथ) हे मुंबईला जाण्यासाठी परळी बसस्थानकावर आले होते. ते परळी ते बोरीवली या एस.टी. बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशातील रोख रक्कम चोरून नेली. या चोरीमध्ये पाचशे रुपयांच्या ५० नोटा असा एकूण २५,००० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.घटनेची माहिती मिळताच विठ्ठल फड यांनी तक्रार दाखल केली असून, संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नागरगोजे करत आहेत. दरम्यान, बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....