अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

बीड जिल्ह्यात इंधन तुटवडा नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण




अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

बीड, दि. ४ मार्च २०२६  आखाती देशातील काही भागात निर्माण झालेल्या युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन करत स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे.

अफवांमुळे काही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी अतिरिक्त इंधन साठवण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसून सर्व पेट्रोल पंपांवर नियमितपणे इंधन पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सर्व पेट्रोल पंप कंपनीचे विक्री अधिकारी व प्रतिनिधींना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी बीड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!