परळीकरांच्या वतीने शोभायात्रा काढत मंगलमय स्वागत...
परळी - सेलु - बोंदरगाव त्वरीत सिमेंट रोड करा-- सौ.शिवकन्या फड
परळी वैजनाथ - प्रतिनिधी..
परळी - सेलु - बोंदरगाव त्वरीत सिमेंट रोड करावा अशी मागणी सेलु येथील सरपंच सौ.शिवकन्या फड व सर्व नागरीकांनी केली आहे.
परळी-सेलु-बोंदरगाव जातांना खुप खड्डे आहेत. अक्षरशः सर्व नागरीकांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. बऱ्याच वर्षापासुन खड्यातुन वाट काढून जावे लागते. अनेक गाड्या पावसाळ्यात तर चिखलामध्ये फसतात. त्यामुळे नागरीकांना खुपच त्रास सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये जाहिर केल्यानुसार 1 हजाराच्या वर लोकसंख्या असलेले गाव सिमेंट रोडने जोडणार असे नमूद केले आहे. तेव्हा परळी-सेलु-बोंदरगाव रोड त्वरीत सिमेंट रोड करावा यासाठी जिल्हयाचे पालकमंत्री सुनेत्रा पवार, खासदार बजरंग सोनवणे, या विभागाचे आमदार धनंजय मुंडे, पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंंडे, जिल्हाधिकारी इत्यादींना याबाबत पत्र देवून मुख्यमंत्र्यांना साकडे घालून ईमेलद्वारे व स्पीड पोस्टाद्वारे, प्रत्यक्षात प्रश्न सोडवण्याची विनंती केली आहे. तेव्हा आमच्या या निवेदनाची सर्वजण दखल घेवून परळी-सेलु-बोंदरगाव सिमेंट रोड करतील अशी अपेक्षा सरपंच शिवकन्या फड यांच्यासह सर्व नागरीकांनी व्यक्त केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा