सर्व स्तरातून अभिनंदन....
शेख मुदस्सीर यांची 'सकल मुस्लिम युवक संघाच्या' प्रदेश संघटक पदी निवड
परळी /प्रतिनिधी :-
परळी येथील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असलेले शेख मुदस्सीर नसीर यांची सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेच्या प्रदेश संघटक पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड दिनांक २३ एप्रिल रोजी करण्यात आहे.
शेख मुदस्सीर हे मागील अनेक वर्षांपासून समाजकारण आणि पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. सामाजिक प्रश्नांची चांगली जाण, लोकांशी संवाद साधण्याची क्षमता आणि युवकांना एकत्र कौशल्य यामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध सामाजिक मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून, गरजूंना मदत करणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि समाजात जागरूकता निर्माण करणे यामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामाची तसेच सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेसोबत सुरुवातीपासून असलेल्या सहभागाची दखल घेत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी त्यांची प्रदेश संघटक म्हणून निवड केली आहे.
" ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची असून, सामाजिक अस्तित्व आणि संवैधानिक अधिकारांसाठी मी अधिक जोमाने काम करणार आहे. संघटनेच्या माध्यमातून राज्यातील युवकांना एकत्र आणून सकारात्मक बदल घडवण्याचा माझा प्रयत्न राहील."
- शेख मुदस्सीर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा