हनुमान व्यायाम शाळेत हनुमान जन्मोत्सव साजरा

परळी वैजनाथ,प्रतिनिधी.

आज देशभर हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात असतानाच, शहरातील नामांकित हनुमान व्यायाम शाळेत हा उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात संपन्न झाला. व्यायामाची आणि शक्तीची देवता मानल्या जाणाऱ्या बजरंगबलीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच व्यायाम शाळेत भाविक आणि व्यायाम शाळेत येणाऱ्या युवकांनी मोठी गर्दी केली होती.

पहाटे मारुतीच्या मूर्तीला हनुमान व्यायाम शाळेचे विश्वस्त नरसिंग देशमुख यांच्या हस्ते अभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली. प्रास्ताविक वैजनाथ ईटके यांनी केले तर रंगनाथ खके गुरुजी व सुभाष नानेकर सर यांनी व्यायामाचे महत्व  यावेळी सांगितले. यावेळी हनुमान व्यायाम शाळेचे जेष्ठ संचालक दत्ताप्पा ईटके गुरुजी, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, त्रिम्बकअप्पा काटकर, चंद्रकांतअप्पा समशेट्टे, महादेवअप्पा फडकरी, ओबीसी परिषदेचे तालुका अध्यक्ष विलास ताटे, अमर देशमुख सर, जेष्ठ पत्रकार अनंत भातांगळे, प्रभुअप्पा साखरे, महात्मा हत्ते गुरुजी, माजी नगरसेवक महादेव ईटके, भाजयुमो शहराध्यक्ष सुशील हरंगुळे, माजी मुख्याध्यापक मुकुंदराव चुंबळकर, बालाजी डोमकलवार, दयानंद स्वामी,  प्रकाश  इटके, वैभव आंबेकर, नागेश फुलारी, कपिल चौधरी, शैलेश काटकर वस्ताद दिगंबर नागराळे, विजय मुंडे सर , माणिकराव नाईकवाडे, राजेश गडदे यांच्या सह हनुमान भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.पुपौरोहित्य दयानंद स्वामी यांनी केले प्रस्तवाना अध्यक्ष वैजनाथ इटके यानी केली. भाषण रंगनाथ खाके सर  सुभाष नाणेकर सर यांनी केले. 

महाप्रसादाचा लाभ घ्यावा

हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने उदया शुक्रवारी  दि 3 एप्रिल रोजी संध्याकाळी संत गुरुलिंग स्वामी मंदिर बेलवाडी येथे सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत महाप्रसाद होईल या महाप्रसादाचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन दत्ताप्पा इटके गुरुजी यांनी केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार