इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

परळीत भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा; भव्य शोभायात्रेचे आयोजन



मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

     परळी वैजनाथ येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. आज रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातून भव्य-दिव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, या सोहळ्यात  सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती चा वतीने करण्यात आले आहे.

        भगवान परशुराम हे विष्णूचे सहावे अवतार मानले जातात. त्यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून दरवर्षी परळी शहरात उत्साहाचे वातावरण असते. यावर्षी देखील परंपरेनुसार शोभायात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेचा प्रारंभ सायंकाळी ५ वाजता संत जगमित्रनागा मंदिर येथून होईल. तेथून ही यात्रा राणी लक्ष्मीबाई टॉवर, गणेशपार, नांदूरवेस, सरकारवाडा या मुख्य मार्गावरून मार्गस्थ होईल. शोभायात्रेचा समारोप आंबेवेस येथील काळाराम मंदिर येथे होईल. या ठिकाणी भगवान परशुरामांची सामूहिक महाआरती करण्यात येईल.

      या शोभायात्रेत महिला, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांनी मोठ्या संख्येने आणि पारंपरिक वेषात सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती चे अध्यक्ष वेदमूर्ती प्रसाद गुरु कुलकर्णी,उपाध्यक्ष विठोबा चाटूफळे, सचिव अविनाश नव्हाडे,कोषाध्यक्ष प्रवीण तोताडे, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार अनंत (पप्पू )कुलकर्णी व प्रशांत रामदासी तसेच सर्व पदाधिकारी सदस्य श्री परशुराम जन्मोत्सव समिती परळी वैजनाथ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या