सोशल मीडियातून नोटिसचा धुमाकूळ....जाणून घ्या सविस्तर काय आहे नोटीस

अखेर "ती" वेळ आलीच… ‘वॉर लॉकडाउन’ ची नोटीस   जारी !



परळी वैजनाथ (इएफडीएन).....
        देशभरात सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक नोटीस मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘वॉर लॉकडाउन’ अशा ठळक शीर्षकाखाली फिरणाऱ्या या पीडीएफ इमेजमुळे नागरिकांमध्ये बघता क्षणीच काही काळ संभ्रम आणि भीती निर्माण होते आणि उत्सुकतेने ही इमेज उघडल्यावर कळते आपल्याला तर एप्रिल फूल बनवण्यात आले आहे.
            जागतिक पातळीवर इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध  परिस्थितीमुळे तणाव आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाउन लागू झाला असून भारतातही लवकरच लॉकडाउन होणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणावर आहेत. याच  आशेचा धागा पकडत परफेक्ट एप्रिल फूल म्हणून ही नोटीस पसरवण्यात आली. त्यामुळे काही क्षण अनेक नागरिकांनी या संदेशावर विश्वास ठेवत चिंता व्यक्त करतच सविस्तर जाणून घेण्यासाठी ही इमेज फाईल ओपन करुन पाहिली अन् मग कळले की हे तर एप्रिल फूल आहे. विशेष म्हणजे, आज दिनांक १ एप्रिल – म्हणजेच एप्रिल फूल डे असल्यामुळे ही संपूर्ण अफवा केवळ लोकांची गंमत करण्यासाठी तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरवर्षी १ एप्रिलला विविध प्रकारचे खोडसाळ संदेश, बनावट बातम्या आणि अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याच परंपरेचा भाग म्हणून ‘वॉर लॉकडाउन’ची ही नोटीस तयार करून लोकांना एप्रिल फूल करण्यात आले.
आवाहन:
        एप्रिल फूल चे असे अनेक संदेश व अशा प्रकारच्या गमतीदार मजकुराच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी ती अधिकृत स्रोतांद्वारे तपासून पाहावी. अफवा पसरवणे टाळावे आणि जबाबदार नागरिक म्हणून वागावे. ‘वॉर लॉकडाउन’ ही नोटीस खरी नसून केवळ एप्रिल फूलचा भाग आहे. नागरिकांनी सतर्क राहून अफवांपासून दूर राहणे आवश्यक आहे.


एमबी न्यूज ची ही बातमी सोशल मीडियावर वाढत्या अफवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जागरूक करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही बातमी एप्रिल फूलची नाही याची नोंद घ्यावी.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार