नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा होणार सत्कार, पुढील आंदोलनाची दिशाही ठरणार

 मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीच्या सर्व संघटनांची शुक्रवारी परळीत व्यापक बैठक


नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा होणार सत्कार, पुढील आंदोलनाची दिशाही ठरणार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीच्या सर्व संघटनांची शुक्रवारी (दि. 3 एप्रिल) रोजी परळीत व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत दोन्ही जमातीतील ज्येष्ठ पदाधिकारी, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा सत्कार होणार आहे. यावेळी समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून त्या मार्गी लावण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. बैठकीला समाजबांधवांनी. ओठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

    विभागातील महादेव कोळी, मल्हार जमातीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी (जात वैधता प्रमाणपत्रे समितीमार्फत  पूर्वीप्रमाणे कोळी नोंदी वरून विना अट देण्यासाठी) विचारविनिमय व  सर्वानुमते चर्चेअंती मराठवाडा स्तरावर आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी परळी वैजनाथ येथे दिनांक 3 एप्रिल 2026 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात होणाऱ्या या बैठकीत एप्रिल महिन्याच्या शेवटच्या  आठवड्यात मराठवाडा स्तरावर छत्रपती संभाजीनगर येथे महादेव कोळी, मल्हार जमातीच्यावतीने प्रत्येक तालुक्यातील बांधवांना सोबत घेऊन शिस्तबद्ध आमरण उपोषण/ साखळी उपोषण/ साखळी धरणे (जे सर्वांच्या विचाराने ठरेल ते) आंदोलन करण्याबाबत विचारविनिमय करून ठरवणे, मराठवाडा विभागात महसूल विभागाच्यावतीने सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, त्या अंतर्गत कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्र विशेष कॅम्पचे आयोजन करण्यासाठी प्रशासनास भाग पाडणे, किंवा सध्या सुरू असलेल्या त्याच अभियानात आपल्या जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत शासनास विनंती करणे आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.याच बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीच्या नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगरपालिका सदस्य, प्रमुख पदाधिकारी, युवा कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 

 या बैठकीला मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि 76 तालुक्यातील फक्त महादेव कोळी आणि मल्हार कोळी प्रमुख बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार