सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

कु.आर्या भातंब्रेकर हिचे दहावीत ९१ टक्के गुणांसह घवघवीत यश





सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

परळी वैजनाथ, प्रतिनिधी: 

     केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घोषित केलेल्या दहावीच्या निकालानुसार छत्रपती संभाजीनगर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु.आर्या अनिरुद्ध भातंब्रेकर हिने ९१ टक्के गुण मिळवून दैदीप्यमान यश संपादन केले आहे. आर्याच्या या यशामुळे तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. 

       कु.आर्या ही निवृत्त गटशिक्षणाधिकारी कै.अशोकराव भातंब्रेकर  यांची नात असून, तिला सुरुवाती पासूनच अभ्यासाची गोडी आहे. सातत्यपूर्ण मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे तिने नव्वदीचा टप्पा पार केला आहे. आर्याच्या या यशाबद्दल  कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.आर्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, आणि शिक्षकांना दिले आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य, शिक्षक तसेच नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!