विवाहाच्या उंबरठ्यावर असलेल्या रेल्वे पोलीस जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
नितीन ढगे हे लोहारा (जि. धाराशिव) येथील रहिवासी होते आणि सध्या परळी वैजनाथ येथे लोहमार्ग पोलीस (GRP) दलात कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२४ मध्ये ते नोकरीस लागले होते. त्यांनी परळीतील माधवबाग परिसरातील एका 'प्ले रूम'मध्ये (खेळायची खोली) गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
नितीन यांचा विवाह अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला होता. ७ मे रोजी त्यांचा विवाह संपन्न होणार होता. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला होता. घरात लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण असतानाच, नितीन यांनी अचानक हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा