परिसरातील गावात होणाऱ्या विजेच्या तुटवड्यावर होणार मात

परळी तालुक्यातील मोहा गावात धनंजय मुंडेंच्या निर्देशानुसार बसवला १० एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर





परिसरातील गावात होणाऱ्या विजेच्या तुटवड्यावर होणार मात

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून महावितरण मार्फत परळी वैद्यनाथ तालुक्यातील मोहा येथे १० एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. परिसरातील विजेच्या तुटवड्यावर यामुळे मात होणार आहे. 

धनंजय मुंडे यांना जनता संवाद उपक्रमांतर्गत मोहा सह परिसरातील गावातील पदाधिकारी व नागरिकांनी याबाबत विनंती केली होती. त्यानुसार महावितरणच्या शाखा अभियंता व कार्यकारी अभियंता यांना सूचना देत धनंजय मुंडे यांनी हा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला आहे. 

यामुळे मोहा सह परिसरातील कान्नापूर, मुंगी, देवठाणा, जैतापूर, त्याचबरोबर बोधेगाव, म्हातारगाव, कावळ्याची वाडी, इत्यादी गावांना लाभ होणार असून, कान्नापूर व बोधेगाव येथील ११ केव्ही वरील अतिरिक्त भार कमी होण्यास मदत मिळून अधिकचा फायदा शेतकरी व नागरिकांना होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!