४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. निधीचा झाला अपहार..
सुदृढ युवकच देश घडवतात, हनुमान व्यायाम शाळेच्या उन्हाळी संस्कार शिबीराच्या माध्यमातून सुदृढ युवक तयार होतात- प्रा.प्रदीप देशमुख
परळी वैजनाथ दि.२४ (प्रतिनिधी)
सद्ढ युवकच देश घडवतात, हनुमान व्यायाम शाळेच्या उन्हाळी संस्कार शिबीराच्या माध्यमातून सद्ढ युवक तयार होतात असे प्रतिपादन प्रा प्रदीप देशमुख यांनी केले. ते येथील हनुमान व्यायाम शाळेच्या उन्हाळी संस्कार शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
शहरातील स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन करण्यात आलेल्या श्री हनुमान व्यायाम शाळेच्या माध्यमातून गेल्या ३६ वर्षांपासून उन्हाळी संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात येते. यंदा ३७ व्या शिबीराचे उद्घाटन श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रा प्रदिप देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यनाथ बॅंकेचे संचालक विजय वाकेकर, प्रमुख पाहुणे वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे जेष्ठ विश्वस्त नागनाथराव देशमुख, लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रवींद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बाजीराव धर्माधिकारी, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, दै. दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी धनंजय आढाव, पत्रकार प्रा प्रविण फुटके डॅा.हरिचंद्र वंगे, वैद्यनाथ कॉलेज चे प्रचार्य प्रा जगदीश जगतकर वैद्यनाथ बॅंकेचे संचालक प्रा विनोद जगतकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हनुमान देवतेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शिबीरार्थींना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे म्हणाले की, आजच्या काळात निरोगी मन म्हणजे निरोगी शरीर फार आवश्यक आहे. गेल्या ३६ वर्षांपासून हनुमान व्यायाम शाळा उन्हाळी संस्कार शिबीराचे आयोजन करते हा उपक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. तर व्यायाम शाळेचे जेष्ठ मार्गदर्शक, माजी अध्यक्ष दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी सांगितले की, व्यायाम शाळेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली असून ३६ वर्षांपूर्वी अमरावतीच्या धर्तीवर हे उन्हाळी संस्कार शिबीराची सुरुवात केली आहे. १० शिबीरार्थीवर सुरू केलेले शिबीर आज वटवृक्ष झाले असून तब्बल ७०० विद्यार्थी या शिबिरात सहभागी होत आहेत. सर्व शिक्षक एक महिना मोफत प्रशिक्षण देत आहेत. वैद्यनाथ बॅंक, श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यातून हे शिबिर आयोजित करण्यात येते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष वैजनाथ ईटके यांनी केले.संचालन आरगडे सर यांनी केले यावेळी , वैद्यनाथ बॅंकेचे संचालक विजय सेठ वाकेकर, रवींद्र देशमुख, बाजीराव धर्माधिकारी, सुरेश टाक, अनंत भातांगळे, प्रा प्रविण फुटके, प्रा डॉ माधव रोडे आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास श्री हनुमान व्यायाम शाळेचे सचिव सुभाष नाणेकर सर त्रिंबकआप्पा. काटकर चंद्रकांत आप्पा समशेटे अमर देशमुख सर महादेव आप्पा फडकरी
नरसिंग देशमुख,विद्यावर्धिनी विद्यालय सचिव प्रभाकरआप्पा ईटके ,ओबीसी परिषद तालुका अध्यक्ष विलासराव ताटे, कुस्तीगीर परिषद अध्यक्ष शिवशंकर कराड हरिभाऊ बनसोडे माजी नगरसेवक महादेव इटके विकास प्रतिष्ठान सहसचिव विकास हालगे माजी प्रचार्य बांगड सर माऊली मुंडे भाजयुमो परळी अध्यक्ष सुशिल हरंगुळे ,जी एस सौंदळे सर , विजय मुंडे, अतुल दुबे,, राजेश गडदे, महात्मा हत्ते सर , प्रभुअप्पा कापसे, उमेश चौंडे , अवधूत आयचित , धनराज पवार, राहूल तिडके , तेजेश टाक,कैलास घुले सर या वेळी कार्यक्रम यशस्वी करण्या साठी वस्ताद दिगंबर नागरळे निशिकांत शिंदे शिवम गर्जे , जगन्नाथ रामदासी , नंदकिशोर पुजारी व पालक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा