इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

आयोजन..... मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

परळीत भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा; संत जगमित्र नागा मंदिर येथे पूजा व कीर्तन



 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

     येथील श्री संत जगमित्र नागा मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ठीक १२ वाजता हा मुख्य जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे अशी माहिती संत जगमित्र नागा मंदिर चे वंशपरंपरागत पुजारी उदय भैय्या औटी यांनी दिली आहे.

        या कार्यक्रमाचे औचित्य साधून सकाळी भगवान परशुराम यांचा विधिवत अभिषेक करण्यात येईल. दुपारी १२ वाजता गुलाल उधळून जन्मोत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने उदगीर येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. संतोष महाराज श्रीडोळे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तरी या जन्मोत्सव सोहळ्यास आणि कीर्तन श्रवणाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन 'सर्व परशुराम भक्त मंडळ' यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या