जनगणना-२०२७ ची तयारी सुरू; १ मे पासून नागरिकांना घरबसल्या 'स्व-गणना' करण्याची संधी
परळी वैजनाथ: प्रतिनिधी
देशाच्या नियोजनाचा मुख्य आधार असलेली 'जनगणना-२०२७' आता पूर्णपणे डिजिटल स्वरूपात पार पडणार आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून नागरिकांना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी 'स्व-गणना' (Self-Enumeration) हा विशेष पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

उपविभागीय जनगणना अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, परळी वै. यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, जनगणनेचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात 'मकान सूचीकरण आणि घरांची गणना' (House-Listing Operations) ही प्रक्रिया १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे.
कशी कराल स्व-गणना?
नागरिकांनी पहिल्या टप्प्यात आपली नोंदणी करण्यासाठी se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे. तेथे मोबाईल नंबर आणि कुटुंबप्रमुखाचे नाव टाकून नोंदणी करावी. सोयीची भाषा निवडून ओटीपी (OTP) द्वारे पडताळणी केल्यानंतर नकाशावर घराचे अचूक ठिकाण निवडावे लागते. विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर ती पुन्हा एकदा तपासून 'Final Submit' करावी.

SE ID जपून ठेवा
यशस्वी नोंदणीनंतर नागरिकांना एक युनिक 'SE ID' मिळेल. या आयडीचा स्क्रीनशॉट काढून ठेवावा किंवा तो लिहून ठेवावा. जेव्हा प्रत्यक्ष प्रगणक अधिकारी (Enumerator) आपल्या घरी येतील, तेव्हा त्यांना फक्त हा SE ID दाखवल्यास आपली गणना पूर्ण मानली जाईल.

डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत होणारी ही १६ वी जनगणना असून, नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा