पं.यादवराज फड यांच्या  गायनात परंपरा आणि आधुनिकतेचा संगम       

  


परळी - संत नारायणबाबांच्या 69 व्या पुण्यतिथीनिमित्त वांगी संस्थानने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात किराणा घराण्याचे प्रख्यात गायक आणि प्रतिभावंत संगीतकार पं.यादवराज फड यांचा " भक्ती - स्वरगंध " हा अभंगवाणीचा अत्यंत श्रवणीय असा अभूतपूर्व रंगलेला कार्यक्रम ऐकून वांगीकर जाणकार रसिकांना पर्वणीच मिळाली. 

पं. यादवराज फड यांनी कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पंचपदीने केली. त्यात अलंकापूरी पुण्यभूमी पवित्र हे ईश स्तवन, जय रामकृष्ण हरी, रूप पहाता लोचनी , जय जय विठ्ठल रखुमाई या रचना त्यांनी अनुक्रमे  दुर्गा, नंद, हमीर या रागात सादर केल्या. त्यानंतर खमाज रागात झाली संध्या संदेह माझा गेला. तीलककामोद रागात ब्रह्मरस गोडी जयासी फावली, मध्यमग्राम भीमपलास हरी दासाचीये घरी या रचना गाऊन रंग भरला. भिन्न षड्ज रागात ज्ञानेश्वर माऊली हा गजर भावपूर्ण गायला. संत कबीरांची मन लागो मेरो यार फकीरी मे, ही रचना आणि कान्होबा तुझी घोंगडी चांगली 

रे ही गौळण अतिशय रंगतदार, भावपूर्ण आणि तयारीने सादर करून रंगतीचा कळस गाठला. रंगलेल्या मैफिलीची सांगता पायाच्या प्रसादे या भैरवीतील अवीट गोडीच्या रचनेने केली. पूर्ण कार्यक्रमाचे संगीत संयोजन पं. यादवराज फड यांचे होते.त्यांना तबला शेखर दरवडे, हार्मोनियम मकरंद खरवंडीकर, मृदंग माणिकराव गरड, यांनी अगदी सवाल जबाब पद्धतीने साथ देऊन कार्यक्रमास चार चाॅंद लावले,टाळ शिवाजी डाके स्वरसाथ राधाकृष्ण गरड यांनी केली. संस्थानाधीपती एकनाथ महाराज माने, श्रीकांत फड,मच्छिंद्र चव्हाण,  बालाजी मोहीते. मदन कदम इत्यादी प्रतिष्ठित कार्यक्रमास उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...