एसीबीची धडक कारवाई

 लाच घेताना महावितरणची महिला सहाय्यक अभियंता रंगेहात जेरबंद; एसीबीची आष्टीत धडक कारवाई



-----------------------------

कडा | प्रतिनिधी :

     बीड जिल्ह्यात लाचखोरीचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा उघड झाले असून आष्टी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत महावितरणच्या महिला सहाय्यक अभियंत्याला रंगेहात पकडले आहे. या घटनेमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

आष्टी येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंता कोमल अर्जुन शिंदे यांनी तक्रारदाराकडून सौर ऊर्जा प्रकल्पाचे ऑडिट पूर्ण करून निधी मंजुरी (फंड रिलीज) करण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.या मागणीबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली.तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने कोमल शिंदे यांना रंगेहात ताब्यात घेतले.या कारवाईत पोलीस उपाधीक्षक सोपान चितमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी खरसाडे, बीडकर व पुरी यांनी सहभाग घेतला. पुढील गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास सुरू आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात सातत्याने उघड होणाऱ्या लाचखोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी वाढत असून, अशा कारवायांमुळे प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा चर्चेत आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....