४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. निधीचा झाला अपहार..
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक
कार्यकर्त्यांसोबत ‘अल्पोपहार ते चाय पे चर्चा' प्रितमताईंच्या कार्यपद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
संघटन वाढवण्यासाठी ताकदीने काम करण्याचा दिली विश्वास
संभाजीनगर. ( दि. २५ ) संभाजीनगर पश्चिम जिल्ह्याच्या भाजपच्या प्रभारी माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांची प्रभारीपदी नियुक्ती होताच त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. पश्चिम जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची त्यांनी अनौपचारीक बैठक घेतली आणि सर्वांशी संवाद साधला. पक्षासाठी तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून देण्यासह संघटन बळकट करण्यासाठी आपण ताकदीने काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
शहरातील जानकी हॉटेल येथे संभाजीनगर पश्चिम जिल्ह्यातील कन्नड विधानसभा, गंगापूर विधानसभा, वैजापूर विधानसभा आणि संभाजीनगर पश्चिमच्या ग्रामीण भागातील पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष यांची डॉ. प्रितमताई मुंडे यांनी अनौपचारीक बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्वांसोबत अल्पोपहार घेऊन चाय पे चर्चा केली. तसेच त्यांनी सर्वांचा परिचय करत संवाद साधला आणि आगामी निवडणुका, पक्ष संघटन आणि आगामी काळातील पक्षाचे उपक्रम यासंदर्भात विचारमंथन केले.
यावेळी उपस्थितांची मुक्तचर्चा करताना डॉ. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की भाजपचे कार्यकर्ते तळमळीने आणि निःस्वार्थपणे काम करतात. काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान मिळवून देण्यासाठी आपण काम करणार आहोत. आज सर्वांशी भेटून मला आनंद होतो आहे. पक्षाने दिलेली जवाबदारी प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने पार पाडणार आहे. प्रदेश भाजप आणि स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी देखील आपण काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांना दिला. बैठकीस जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्याप्रमाणेच प्रितमताईंची कार्यपद्धती : संजय खंबायते
प्रभारी पदाची जवाबदारी मिळताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा परिचय व्हावा म्हणून बैठक घेतली. केवळ बैठक आयोजित न करता त्यांनी सर्वांसोबत बसून अल्पोपहार घेतला. सर्वांना वेळ देऊन सर्वांशी आपुलकीने संवाद साधला.कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी ही कृती होती.मुंडे साहेबांना कार्यकर्ते हवेहवेसे असायचे, प्रितमताईंची कार्यपद्धती देखील मुंडे साहेबांसारखीच असल्याने पुढील काळात पक्ष कार्य जोमाने होणार असल्याचे जिल्ह्याध्यक्ष संजय खंबायते यावेळी म्हणाले.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा