विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

इमेज
  स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी? माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी परळी | प्रतिनिधी    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजक...

 पी.एस.आय लक्ष्मण उंबरे यांची ए.पी.आय पदावर पदोन्नती

परळी प्रतिनिधी :

कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि जबाबदारीने सेवा बजावणारे पी.एस.आय लक्ष्मण उंबरे यांची नुकतीच ए.पी.आय (असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर) पदावर पदोन्नती झाल्याबद्दल रविवार दिनांक २४ मे रोजी परळी येथील चेमरी रेस्ट हाऊस येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी उंबरे यांच्या कार्याचा गौरव करत पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी फुले-आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे, लक्ष्मण वैराळ, विनोद उंबरे, हेड कॉन्स्टेबल कोरडे, मेजर, पोलिस नाईक गवते, पोलीस कॉन्स्टेबल भोसले, पो. कॉ. भोसले, पो. कॉ. कोकाटे, पो. कॉ. गमे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच शाल-श्रीफळ प्रदान करून त्यांचा सत्कार केला.

लक्ष्मण उंबरे हे सध्या राज्याचे माजी मंत्री मा. धनंजय मुंडे यांच्या व्ही.आय.पी. सुरक्षा पथकात पी.एस.आय म्हणून कार्यरत असून त्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष आणि तत्पर सेवेमुळे विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी त्यांच्या सुरक्षा पथकातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी उंबरे यांच्या पुढील प्रशासकीय आणि सेवाभिमुख वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या