पुणे काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतले प्रभू वैद्यनाथांचे दर्शन ; परळीकरांच्या वतीने उत्साहात स्वागत 





परळी वैजनाथ, प्रतिनिधी : 

    पुणे नगरीचे माजी महापौर तथा विद्यमान पुणे महापालिका सदस्य आणि पुणे काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज परळी वैजनाथ येथे भेट देऊन पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.

       परळी वैजनाथ ही अध्यात्म, संस्कृती आणि भक्तीची नगरी म्हणून ओळखली जाते. राज्याच्या विविध भागांतून भाविक प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी येथे येत असतात. या प्रसंगी बोलताना प्रशांत जगताप यांनी परळी नगरीच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक वाटचालीचे कौतुक केले. तसेच येथील नागरिकांनी दाखविलेल्या आत्मीय स्वागताबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यासह ज्येष्ठ नेते पत्रकार जी.एस.सौंदळे, युवक नेते दीपक तांदळे, चेतन सौंदळे, नगरसेवक सचिन सारडा, कैलास तांदळे, प्रणव परळीकर आदिशह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार